All State Govt Jobs

Maharashtra RTE Admission Process 2024-25 Last Date 

Maharashtra RTE Admission Registration Process : आता प्रतीक्षा संपली कारण की, समाजातील प्रत्येक घटकाला भारतीय संविधानाने मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 अंतर्गत दुर्बल व वंचित घटकातील बालकांना शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे. त्या अंतर्गत बालकांना खाजगी विनाअनुदानित शाळा व खाजगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये 25% आरक्षण देण्यात आले आहे. गरीब व वंचित घटकातील मुलांना त्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राखून ठेवण्यात आले आहे. जर RTE Admission 2024 बद्दल माहिती जाणून घ्यायचे असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे, व सर्व माहिती या लेखांमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया.


Maharashtra RTE Admission 2024 Information in Marathi 

शिक्षणाचा हक्क 2009 या अधिनियमानुसार प्रत्येक घटकातील दुर्बल वंचित घटकाकरिता 25 टक्के आरक्षण देण्यात आले. यामध्ये ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अंतर्गत अर्ज भरून घेऊन त्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिले जाते, ज्या शाळांमध्ये  गरीब विद्यार्थ्यांना फी व इतर कारणामुळे ॲडमिशन घेता येत नाही, त्यांना या कायद्याअंतर्गत मोफत प्रवेश मिळवता येते. त्या संदर्भात अधिक माहिती खालील प्रमाणे: 

Maharashtra RTE Admission Process 2024

 

Name 

RTE Admission 2024-25

Standard 

Play Group to 1st standard 

Mode of Application 

Online 

Department Name 

Government of Maharashtra 

Category 

All Category 

Age Limit 

3 to 6 Year 

Start Date 

16/04/2024

End Date 

30/04/2024

Official Website 

student.maharashtra.gov.in

 

Maha RTE Admission 2024 Documents List in Marathi 

RTE Admission 2024 प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने असल्याने विद्यार्थ्यांच्या पालकांनी खालील कागदपत्राची जुळवा जुळव  करून ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे अपलोड करावे. कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे: 

  • अनाथ असल्यास त्याचा पुरावा 

  • दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र 

  • उत्पन्नाचा दाखला 

  • जातीचा दाखला 

  • जन्म दाखला 

  • रहिवासी पुरावा

RTE Admission Registration Process 2024 in Marathi 

RTE अंतर्गत सर्व प्रक्रिया ही ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते त्यामुळे मला अर्ज सुरुवातीचे दिनांक १६ एप्रिल व शेवटचे दिनांक ३० एप्रिल आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांना या कायद्याअंतर्गत काय नियम व अटी देण्यात आलेले आहेत त्या संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आलेले असून या संदर्भात योग्य ती माहिती पालकांनी वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा जेणेकरून प्रवेश मिळवताना कोणतेही अडचण येणार नाही. यामधील महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे: 

  • बालकांचा मोफत व शक्तीच्या शिक्षणाचा अधिकार 2009 अधिनियमानुसार प्राथमिक वर्ग स्तरावर 25% आरक्षणासहित पालकांकडून विहित काल मर्यादा मध्ये अर्ज मागविले जातात. 

  • या आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न एका लाखापेक्षा कमी आहे व ते दुर्बल घटकांमध्ये त्यांचा समावेश होतो. 

  • मला नर्स करताना पालकांनी विचारपूर्वक आपल्या क्षेत्राजवळ दहा शाळांची निवड करावी. 

  • प्रवेश प्रक्रिया दरम्यान काय समस्या आढळून आल्यास त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट वरती मदत केंद्राची माहिती देण्यात आलेली आहे त्यांच्याशी पालकांनी संपर्क करून आपल्या समस्येचे निराकरण करून घ्यावे. 

  • पालकांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना अचूक माहिती भरावी 

  • ज्या पालकांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. 

  • पालकांनी एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा एकापेक्षा अधिक अर्ज भरण्याची निदर्शनास आल्यास त्यातील एकही अर्ज लॉटरीसाठी विचारात घेतला जाणार नाही व संबंधित अर्ज रद्द करण्यात येईल

Maha RTE Admission Age Limit in Marathi 2024-25 

Maha RTE admission 2024 या अंतर्गत बालकांचे नियमावली खालील प्रमाणे देण्यात आले आहे त्याचा पालकांनी विचार करून अर्ज करावा. 

 

Nu.

Standard 

Age Limit 

Minimum Age Limit 

1

Play Group/Nursery 

01/07/2020 to 30/12/2021

3 Year 

2

Junior KG 

01/072020 to 31/12/2020

4 Year 

3

Senior KG

01/07/2019 to 31/12/2019

5 Year 

4

1st Standard 

01/07/2018 to 31/12/2018

6 Year 

How to Apply Online RTE Admission Registration 2024-25 

RTE ऍडमिशन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आम्ही Step by Step खाली देत आहोत, त्याप्रमाणे पालकांनी अर्ज करताना सविस्तर रित्या अर्ज सादर करावा.

  • त्यांनी दिलेल्या official website Click Here वरतीच आलान अर्ज सादर करावा. 

  • त्यानंतर ऑनलाईन न्यू रजिस्ट्रेशन करून घ्या व तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल.  

  • तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चा वापर करून लॉगिन करून घ्या व विद्यार्थ्यांची माहिती तसेच पालकांची माहिती व योग्य रित्या भरावी. 

  • त्यानंतर तुमचा संपूर्ण पत्ता टाकावा लागेल व तुमच्या पत्त्यानुसार तेथील शाळांची यादी निवडावी लागेल. 

  • तुम्हाला त्या शाळांमधून अनुक्रमरित्या Preference द्यावा लागेल. 

  • आता यापूर्वी सांगण्यात आलेले वरील सर्व कागदपत्रे अपलोड करावे. 

  • यानंतर तुमचा application फॉर्म confirm करावा.

  • Form Confirm झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्या. व आता लॉटरी लागण्याची वाट पहा. 

  • लिस्टमध्ये नाव आल्यास तुम्ही पुढील प्रोसेस करू शकता. 

  • अशा पद्धतीने तुम्ही RTE Admission फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरू शकता.

 

FAQ 

Q.विद्यार्थ्यांच्या पालकांनी किती शाळा व कोणत्या माध्यमासाठी कसे अर्ज करू शकतात? 

A.यामध्ये ऑनलाइन अर्ज भरताना पालकांनी त्यांच्या रहिवासी असलेला पत्त्यापासून कमीत कमी एक किलोमीटर ते जास्तीत जास्त तीन किलोमीटर पर्यंत या अंतरापर्यंतच्या यादीत असलेल्या जास्तीत जास्त दहा शाळांमध्ये अर्ज करू शकतील. 

Q. महाराष्ट्र RTE Admission 2024 25 साठी अर्ज करण्याची तारीख कोणती आहे? 

A.अर्ज करण्यासाठी 16/04/2024 ते 30/04/2024 हे महत्त्वाच्या तारखा आहेत. 

Q. अर्ज केलेल्या पालकांना खात्रीशीर प्रवेश मिळेलच का? 

A.शाळेच्या सुरुवातीच्या वर्गाच्या 25% प्रवेश क्षमतेच्या जास्त अर्ज प्राप्त झाल्यास वाटणी पद्धतीने प्रवेश दिला जातात त्यामध्ये प्रत्येक अर्जदाराच्या पाल्याला प्रवेश मिळेलच असे खात्रीने सांगता येणार नाही. 

About the author

gourav sahu

Leave a Comment