All State Govt Jobs

Maharashtra Sarkari Naukri | Maharashtra Shikshak Bharti 2023

Maharashtra Shikshak Bharti 2023 पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023


महाराष्ट्र राज्य सरकारने गेल्या खूप दिवसा पासून रखडलेली शिक्षक भरती ला अखेर मुहूर्त लागला, ऑगस्ट महिन्यात 17 तारखे पासून जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे, त्यामुळे जे उमेदवार शिक्षक भरती प्रक्रिया वाट बघत होते, त्यासाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र मध्ये एकूण प्राथमिक आणि माध्यमिक शाळा यामध्ये एकूण 67000/- शिक्षकाची पदे रिक्त आहेत, हे रिक्त पदे भरावयाची मागणी शासनाकडे पाठपुरावा केला आहे, याचीच दखल घेऊन पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती करण्यात येणार आहे. आज आपण या लेखामध्ये पवित्र पोर्टल वर भरती प्रक्रिया कशी राबवणार? शिक्षक भरती संबधित पात्रता काय असेल? मुलाखत संबधित तयारी कशी करावी? शिक्षक भरती २०२३ चे संपुर्ण वेळापत्रक? पवित्र पोर्टल काय आहे? असे अनेक प्रश्नाची उत्तरे या लेखात मिळणार आहे. 

Pavitra Portal Shikshak Bharti 2023/महाराष्ट्र शिक्षक भरती 2023

महाराष्ट्र सरकारने एकूण 30000+ पदांसाठी शिक्षक भरती करण्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी जाहीर केले आहे. शिक्षक भरती यामधील गैरप्रकार होऊ न देता सुरळीतपणे होण्यासाठी पवित्र पोर्टलचे निवड करण्यात आली आहे.महाराष्ट्र सरकारने 2017 साली या पोर्टल ची मुख्यत: शिक्षक भरती करण्यासाठी निवड करण्यात आली आहे, मागील पाच वर्षापासून शिक्षक भरती झाली नाही थोडक्यात माहिती खालील प्रमाणे: 

Department 

महाराष्ट्र शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

Total Post

30000+

Job Location 

All Over Maharashtra 

Date

15 ऑगस्ट 2023

Official Website 

CLICK HERE 

Apply Link

CLICK HERE 

महाराष्ट्र शिक्षक भरती प्रक्रिया २०२३ Shikshak Bharti 2023 Process

शिक्षक भरती प्रक्रिया सुरळीत पणे राबवण्यासाठी पवित्र पोर्टल ची नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी 2023 मध्ये एकूण 30000 पदासाठी संपुर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरती प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत घेण्यात येणार आहे. याची निवड प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे, यामधे दोन टप्पे महत्वाचे आहेत, पसंतीक्रम आणि TAIT मध्ये मिळालेले गुण या गोष्टी महत्वाचे आहेत. शासनाने अधिकृत अशी कोणतीही भरती प्रक्रिया सांगण्यात आले नाही. पवित्र पोर्टल वर रिक्त जागांची माहिती महाराष्ट्र शासनाचा विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 पात्रता : 

शिक्षक भरती ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार असून त्यासाठी कोणकोणते पात्रते चे नकारावे लागतात यामध्ये B.Ed. आणि D.Ed या उत्तीर्ण उमेदवारांना पात्रतेचे निकष खालील प्रमाणे: 

 • मागणीसाठी उमेदवार महाराष्ट्राचा नागरिक असणे आवश्यक आह.

 • महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT 2023) आणि CTET ही परीक्षा दिलेले उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करता येईल.

 • इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत उमेदवाराने D.Ed.उत्तीर्ण आणि TET/CTET त्यामधील पेपर वन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 • इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत उमेदवाराने D.Ed/ B.Ed उत्तीर्ण असावा आणि त्याबरोबरच TET/CTETया परीक्षांचे पेपर दोन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 • इयत्ता नववी ते बारावी साठी उमेदवारांचे B.Ed आणि पदवीत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 

Pavitra Portal Shikshak Bharti Timetable शिक्षक भरती वेळापत्रक जाहीर 

शिक्षक भरती प्रक्रिया ऑगस्ट महिन्यात सुरुवात होणार असून पवित्र पोर्टल ने वेळापत्रक जाहीर केले आहे, या संपुर्ण प्रक्रिया पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रकाला पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात आली आहे. 

 • 15 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान पोर्टल वरती जाहिरात प्रसिद्ध होतील.

 • 1 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023 दरम्यान प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल.

 • 10 ऑक्टेंबर दरम्यान निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

 • 11 ऑक्टोंबर 2023 ते  21 ऑक्टोंबर 2023 दरम्यान नेमणुका देण्यात येतील.

 • 21 सप्टेंबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान जिल्हास्तरावर उमेदवारांचे कौन्सिलिंग करण्यात येईल.

Shikshak Bharti Requirement Documents शिक्षक भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे 

महाराष्ट्र शासनाचा शिक्षण विभागाने पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती प्रक्रियेला 15 ऑगस्ट सुरुवात होणार आहे तर पात्र उमेदवाराने कोण कोणते कागदपत्रे या पवित्र पोर्टल वरती नोंदणी करण्याच्या वेळेस आवश्यक आहेत असे सर्व कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे: 

 1. दहावीचे गुणपत्रक व प्रमाणपत्र

 2. बारावीचे बोर्ड प्रमाणपत्र व गुणपत्रक

 3. पदवीचे विद्यापीठ प्रमाणपत्र व गुणपत्रक

 4. व्यवसायिक प्रमाणपत्र

 5. आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जातीचे प्रमाणपत्र

 6. नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 7. दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)

 8. रहिवासी दाखला

 9. TET परीक्षा प्रमाणपत्र

 10. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र

 11. महिला उमेदवारांना महिला आरक्षण संदर्भात लागणारे सर्व कागदपत्रे. 

Conclusion: 

महाराष्ट्र शिक्षक भरती ही खूप दिवसापासून या भरतीचे उमेदवार वाट पाहत होते, त्या पात्र उमेदवारांना ही एक सुवर्णसंधी आहे, नक्कीच या जाहिराती प्रसिद्ध झाल्यानंतर वेळोवेळी आम्ही तुम्हाला Update करत राहो, धन्यवाद.

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment