All State Govt Jobs

〈Maharashtra Vanrakshak Bharti〉 ⇔ | Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti 2023 

Maharashtra Van Vibhag Vanrakshak Bharti 2023 : महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनरक्षक पदासाठी (Vanrakshak Bharti 2023) कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे कारण की, वनरक्षक या पदासाठी तब्बल 2138+ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. वन विभागामध्ये शेवटची जाहिरात 2021 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती, वन रक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे.गेला तब्बल तीन वर्षापासून या जाहिरातींची प्रतीक्षा होती अखेर ते प्रतीक्षा संपली आहे. आज आपण या लेखामध्ये वनरक्षक पदासाठी घेण्यात येणारे भरती प्रक्रिया कशी असेल? वनरक्षक पदासाठी पदासाठीचा अभ्यासक्रम? वनरक्षक पदासाठी प्रक्रिया अर्ज सादर कसा करावा? त्यासाठी दिलेली ठरावीक मुदत वयोमर्यादा मध्ये वाढ? याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित असतील तर या सर्व प्रश्नांची उत्तरे या एकाच लेखा मध्ये मिळून जाईल. 

Maharashtra Vanrakshak Bharti 2023 Overview 

वनरक्षक पदासाठी अर्ज करताना पात्र उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. महाराष्ट्र शासनाने वयोमर्यादा बाबतीत घेतलेले निर्णय येथेही लागू आहेत. तर वय मर्यादा मध्ये दोन वर्षे शिथिल करण्यात आले आहे. भरती प्रक्रिये दरम्यान वेळोवेळी त्यांच्या संकेतस्थळावर अद्रक माहिती प्रसिद्ध करण्यात येईल व उमेदवाराने त्यासंबंधी दक्षता घ्यावी. वनरक्षक भरती संदर्भात थोडक्यात माहिती घेऊ. 

Department 

Maharashtra Forest Department 

Post Name 

Vanrkshak Forest Guard 

Total Post 

2138

Salary 

21700-69700

Education Qualification 

12th 

Age Limit 

18-27

Exam Fee 

Open -1000

Caste -900

Last Date 

30/06/2023

Official Website 

CLICK HERE 

Vanrakshak Bharti Exam Pattern (भरती प्रक्रिया) 

वनरक्षक पदासाठी जाहिरात  प्रसिद्ध करण्यात आले आहे, तर वनरक्षक पदासाठी विविध टप्प्यामध्ये निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे यामध्ये सुरुवातीला लेखी परीक्षा असून लेखी परीक्षेत 45 टक्के गुण मिळवणारे विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरणार आहेत. नेमकी कोणत्या पद्धतीने अर्ज करावा व त्यासाठी कोणती कागदपत्रे गरजेचे आहे, याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेले आहे.

Vanrakshak Bharti Exam Process 2023

Vanrakshak Bharti Syllabus : 

वनरक्षक पदासाठी सुरुवातीला लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे, ही लेखी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे आणि हि परीक्षा Tata consultancy Services TCS मार्फत घेण्यात येणार आहे, वनरक्षक पदासाठी अभ्यासक्रम मध्ये एकूण 4 विषय आहेत. ऑनलाइन परिक्षेत प्रश्नाचा स्स्तर 10 वी परीक्षेच्या दर्जांच्या समान असेल, परीक्षा ही 2 तासाची राहील. त्याबद्दल माहिती पुढील प्रमाणे: 

विषय 

गुण

मराठी व्याकरण 

30(प्रश्न 15)

इंग्रजी व्याकरण 

30 (प्रश्न 15)

सामान्य ज्ञान 

30 (प्रश्न 15)

बुद्धिमत्ता चाचणी 

30 (प्रश्न 15)

How To Apply Online Vanrakshak Bharti 2023 : 

वनरक्षक पदासाठी पात्र उमेदवारांनी थेट संकेत स्थळावर 10 तारखे नंतर उपलब्ध होणार आहे. त्यासंबंधी अर्ज करताना उमेदवार माहिती नीट वाचून अर्ज करावा जेणे करून अर्ज यशस्वी रित्या सादर होइल. 

त्यासंबंधी अधिक माहिती खालील प्रमाणे:

  1. उमेदवार हे फक्त कोणत्याही एका वनवृत्तासाठी अर्ज करू शकेल. एक पेक्षा अधिक वनवृत्तासाठी अर्ज सादर केल्यास व तसे आढळल्यास सुरुवातीला ज्या वनवृत्तासाठी साठी अर्ज केला आहे तेच ग्राह्य धरले जाईल.

  2. उमेदवार अर्ज करताना फक्त ऑनलाईन पद्धतीने करावे.

  3. उमेदवार वरील दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा

  4. शैक्षणिक माहिती वैयक्तिक माहिती व इतर संबंधित सूचनांचे पालन करून अर्ज करताना व्यवस्थित व योग्यरीत्या माहिती टाकावे जेणेकरून पुढे कोणत्याही प्रकारे तक्रार उद्भव नये.

  5. छायाचित्र व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी संबंधित माहिती पीडीएफ मध्ये देण्यात आली आहे. 

  6. अर्ज सादर केल्यानंतर परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही. 

  7. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती व्यवस्थितरित्या भरून व परीक्षा शुल्क भरलेला उमेदवारांची स्थिती, परीक्षांचे वेळापत्रक इत्यादी बाबतची माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासंबंधी कोणत्या प्रकारे पत्रव्यवहार केला जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी संकेतस्थळावर भेट देऊन भरती प्रक्रियेच्या माहिती बाबत अद्यावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल.

Vanrakshak District Wise Post Details 

वनरक्षक पदासाठी एकूण 2138 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेआहे. त्यामध्ये प्रत्येक वनवृत्तानुसार जागांची विभागणी करण्यात आली आहे, नेमके नागपूर विभागात अधिक जागा आहेत. प्रत्येक वन वृत्तानुसार जागांची विभागणी खालील प्रमाणे: 

विभाग 

जागा

कोल्हापूर

279

ठाणे 

266

पुणे 

64

नाशिक 

41

धुळे

73

औंरगाबाद

51

यवतमाळ

55

अमरावती 

20

गडचिरोली

49

चंद्रपूर

111

नागपूर 

277

Vanrakshak Bharti Important Date and Link

वनरक्षक भरती प्रक्रिये ला सुरुवात होईलच, तर पात्र उमेदवारांनी या सुवर्ण संधी चा नक्कीच फायदा घेतला पाहिजे. या भरती संदर्भात सर्व update तुम्हाला वेळोवेळी याठिकाणी नक्कीच आपल्या पर्यंत पोहोचवू. 

Advertisement PDF 

PDF 

Start Date 

10/6/2023

Last Date 

30/06/2023

Apply Online 

CLICK HERE 

About the author

Bhaskar Jobs

1 Comment

Leave a Comment