All State Govt Jobs

Maharashtra Govt Jobs 2024 | Maharashtra Home Guard Bharti 2024      

मागील अनेक वर्षापासून प्रतीक्षेत असलेले Maharashtra Home Guard Bharti ची अधिसूचना जाहीर करण्यात आले आहे. जे विद्यार्थी होम गार्ड तयारी करत होते त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. खूप वर्षापासून उमेदवार या जाहिरातीच्या प्रतीक्षेत होते, तर एकूण 10285 पदासाठी जाहिरात मार्च महिन्यात प्रसिद्ध होणार आहे. सणवार असो, सामाजिक तणावाचे वातावरण, तसेच निवडणूक की नैसर्गिक आपत्तीचे परिस्थिती असे प्रत्येक ठिकाणी Home Guard ना बंदोबस्त मध्ये सामाजिक योगदान आहे. याचे महत्व लक्ष्यात घेता, महाराष्ट्र सरकारने Home Guard Bharti 2024 करण्याचे आयोजित आहे यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. 

Maharashtra Home Guard Latest News 2024

Maharashtra Home Guard Bharti 2024

महाराष्ट्र सरकारने Home Guard संबंधित प्रलंबित मागणी होती त्यामध्ये भरती, सोबत एकूण दिवसाचे प्रमाण, भत्ता इतर अनेक बाबी महाराष्ट्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येत होता. अंतर्गत त्याला यश मिळाले असून एकूण 10285/-  पदांसाठी मार्च महिन्यात Home Guard Bharti 2024 प्रक्रियेला सुरुवात होत आहे. 

Department 

Maharashtra Home Defence Department 

Post Name 

Home Guard 

Total Post 

10285

Last date 

Update Soon

Salary 

Daily Basis 

Official Website 

CLICK HERE 

PDF 

Click Here 

Age Limit 

18-35 

Exam Fee 

100 

Maharashtra Home Guard Duty List 2024 

महाराष्ट्र सरकारने होमगार्ड पदासाठी Duty List दरवर्षी निवडक काळासाठी त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जाते. त्यानुसार होमगार्ड हे त्या काळासाठी तेथे बंदोबस्त आपली सेवा बजावतात यामध्ये त्यांना आवश्यक ते भत्ते व पगार दिला जातो . 

Maharashtra Home Guard Full Information 2024

होमगार्ड या पदांचे भरती मध्ये विविध विभागातील उमेदवारांची भरती केली जाते, त्यांचा उद्देश एक चांगला नागरिक घडविणे हा आहे आणि साधारणपणे याची सभासद तीन ते पाच वर्ष असते यानंतर स्पर्धा परीक्षा किंवा इतर परीक्षांमध्ये याचा लाभ उमेदवारला घेता येते. होमगार्ड या पदासाठी शैक्षणिक पात्रता बारावी असावी, तसेच शारीरिक चाचणी देखील पार पडते यामध्ये धावणे, गोळा फेक, व Push Up याचा देखील समावेश होतो. यासोबत मुलाखतीचा देखील समावेश आहे. जे विद्यार्थी होमगार्ड या पदावर तीन वर्षे काम करतात त्यांना पोलीस भरती मध्ये पाच टक्के आरक्षण आहे. 

  •  बारावी उत्तीर्ण असावा

  •  वयोमर्यादा – 18-50

  • कामाचे दिवस – 160(१ वर्ष)

  • निवड पद्धत – शारीरिक चाचणी व मुलाखत

या पदा संदर्भात आवश्यक ती माहिती थोडक्यात जाणून घेतले जे उमेदवार पोलीस भरती करतात त्या उमेदवारांना होमगार्ड या पदांचे देखील गांभीर्याने विचार करावा जेणेकरून त्यांना पोलीस भरतीमध्ये लाभ घेता येईल.

Maharashtra Home Guard Salary 2024 

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाअंतर्गत होमगार्ड जवानांची भरती करण्यात येते, यामध्ये मुख्यतः कायदा व सुव्यवस्था तसेच बंदोबस्त करिता यांची निवड करण्यात येते. सदर बंदोबस्त कालावधीत होमगार्ड जवानांना प्रतिदिन 600 रुपये व तसेच 100 रुपये उपहार भत्ता दिला जातो. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग अंतर्गत होमगार्ड जवानांचे प्रतिदिन भत्ता वेळोवेळी यामध्ये अद्यावत केले जातात. होमगार्ड या पदाचे विशिष्ट अशी भरती प्रक्रिया घेऊन उमेदवारांची निवड केली जाते. 

Maharashtra Home Guard Official Website (Update)

होमगार्ड भरती की गृह मंत्रालय अंतर्गत भरतीची प्रक्रिया केली जाते, त्या अनुषंगाने अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी माहिती उमेदवारांनी पहावी व त्यासंदर्भात माहिती मिळवावी यासंदर्भात नवीन अपडेट आल्यास लवकरात लवकर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो त्यामुळे हा लेख सेव करून ठेवावा. त्यासंदर्भात अधिकृत संकेतस्थळ Maha Home Guard Bharti 2024 हे आहे

Maharashtra Home Guard Log in (Apply Online)

या पदासाठी होणारी भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने भरण्यात येते तसेच ठराविक कालावधीमध्ये ही भरतीची प्रक्रिया राबविले जाते. हा भरती प्रक्रियेमध्ये एकूण दोन टप्पे असतात तर प्रत्येक टप्प्यामध्ये उमेदवाराला उत्तीर्ण होणे आवश्यक आहे तसेच ऑनलाईन अर्ज करताना होऊ आवश्यक ती योग्य माहिती भरावी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करताना पुढील टप्पे लक्षात घ्यावे.

  1. उमेदवारांना वरील अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

  2. जाहिरात सविस्तरपणे वाचून आवश्यक ती माहिती भरावी.

  3. भरलेली माहिती योग्य आहे की नाही एकदा तपासून पहावी तसेच शैक्षणिक अर्हता तपासून पहावे.

  4. या पदासाठी संबंधित आवश्यक कागदपत्रे upload करावी. 

  5. सगळ्यात शेवटी पेमेंट पेमेंट करून परीक्षा फॉर्म भरावी.

Maharashtra Home Guard Certificate 2024 

Home Guard या पदांची उमेदवाराला तीन ते पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र मिळते तसेच उमेदवार आपली सेवा अखंडितपणे चालू ठेवू शकतात. 

Maharashtra Home Guard Bharti Online Duty  

महाराष्ट्र राज्य सरकारने अधिकृत पणे Home Guard संबंधित सर्व माहिती Online प्रसिद्ध करण्यात येते, त्यामुळे उमेदवाराने ऑनलाईन सर्व माहिती वेळोवेळी पाहावे. 

About the author

Bhaskar Jobs

Leave a Comment